वाडा...
संध्याकाळ होत होती. सूर्य मावळतीच्या दिशेने आपली झेप घेत होता. सातारा हे शहर अजिंक्यतारा या किल्ल्यापासून लागूनच असल्याने लांबून जरी बघितले तरी त्या मावळत्या शहराचे द्रुश्य खूपच मस्त दिसते. मन अगदी भरभरून जाते राव...! ती शनिवारची संध्याकाळ, सर्व लोक दमून-भागून आपल्या कामातून कामातून घरी जात होते. तो डिसेंबर चा महिना... अगदीच थंडीचे वातावरण. तरीही, लोकांची वद्रळ तेवढीच होती. अरे!..कुठे राहिला हा अमोल राव?......परेश. "याच ना नेहमीचच आहे, दरवेळी उशीर लावतो हा"...अभिजित. होय ना राव!.."ये पऱ्या फोन लाव रे त्याला". बघ कुठे आहे तो अजून?....प्रदीप "तू लाव की, unlimited balance वाला तूच आहेस ना या जगात"....परेश चेष्टेने हसत हसत बोलू लागला. "बर भावा मीच लावतो, माहीत आहे किती कंजूस आहेस ते"....प्रदीप म्हणाला. "अरे!..हा बघ आला"....अभिजित. "शंभर वर्षे आयुष्य आहे बाबा तूला"...या स्वागत करा महाशयांचे"...प्रदीप. "सॉरी यार!...