वाडा...

                   
                        


संध्याकाळ होत होती. सूर्य मावळतीच्या दिशेने आपली झेप घेत होता. सातारा हे शहर अजिंक्यतारा या किल्ल्यापासून लागूनच असल्याने लांबून जरी बघितले तरी त्या मावळत्या शहराचे द्रुश्य खूपच मस्त दिसते. मन अगदी भरभरून जाते राव...!
ती शनिवारची संध्याकाळ, सर्व लोक दमून-भागून आपल्या कामातून कामातून घरी जात होते. तो डिसेंबर चा महिना... अगदीच थंडीचे वातावरण. तरीही, लोकांची वद्रळ तेवढीच होती.
अरे!..कुठे राहिला  हा अमोल राव?......परेश.
"याच ना नेहमीचच आहे, दरवेळी उशीर लावतो हा"...अभिजित.
होय ना राव!.."ये पऱ्या फोन लाव रे त्याला". बघ कुठे आहे तो अजून?....प्रदीप
"तू लाव की, unlimited balance वाला तूच आहेस ना या जगात"....परेश चेष्टेने हसत हसत बोलू लागला.
"बर भावा मीच लावतो, माहीत आहे किती कंजूस आहेस ते"....प्रदीप म्हणाला.
‌‌"अरे!..हा बघ आला"....अभिजित.
"शंभर वर्षे आयुष्य आहे बाबा तूला"...या स्वागत करा महाशयांचे"...प्रदीप.
"सॉरी यार!..अरे निघायला खूप उशीर झाला आणि केवढी गर्दी होती येताना"...अमोल डोक खाजवत बोलू लागला.
"अच्छा अस का !...girl friend असल्यावर बर वेळेवर येतोस रे आणि मित्र असल्यावर बराच उशीर होतो तूला, माकडा कधी सुधारणार राव तू".....परेश म्हणाला.
सगळेजण खूपच हसू लागले.
अमोल,परेश उर्फ पऱ्या, प्रदीप आणि अभिजित लहानपणापासूनचे जिवलग मित्र. अगदीच म्हणायचं तर चड्डी बड्डी यारच. शाळेतही एकत्र, त्यानंतर कॉलेजला पण एकत्रच. शिक्षण झाल्यानंतर  सर्वजण आपल्या आपल्या जॉब ला लागले. कधी नाही ते खूप दिवसांनी एकत्र आपल्या नेहमीच्या चंदू चहाच्या कट्ट्यावर भेटले.
"मग, काय म्हणता अमोलराव आज काल खूप व्यस असता, काय राव कधी तरी एखादा कॉल नाहीतर मेसेज करत जावा"...प्रदीप म्हणाला.
अरे , भावा आजकाल कामच ऐवढ असते ना...वेळच भेटत नाही राव कामामुळे..... अमोल.
"होय. ते ठीक आहे. पण मी काय म्हणतोय, खूप दिवस झाले आपण कुठे फिरायला नाही गेलो. तशीही उद्या सुट्टीच आहे. तेवढाच मूडही फ्रेश होइल"......अभिजित 
आयला लवकर सुचत राव तूला, म्हममम....वाटलच मला तूझ्या डोक्याचा फ्युज लयच उशीरा स्टार्ट होतो.... परेश अभिची खिल्ली उडवत मोठ्याने हसू लागला.
"अरे, पण जायच कुठे ? ते तरी ठरवा आधी... प्रदीप.
मग, महाबळेश्वरला जायच का?.....अभिजित.
ये तू गप्प रे....कंटाळा आलाय तिकडे जाऊन जाऊन..
माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे... सातारा-पुणे ला जातानाच एक 'भोर' नावाच गाव आहे. खूप सुंदर ठिकाण आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे मस्त जंगल आहे आणि धबधबा पण आहे तिकडे..... परेश म्हणतो
what you say ?...भोर !!!...पण मी तर ऐकलय तिथले ठिकाण खूप भयानक आहे.... आणि तिथे एक खूप मोठा वाडा पण आहे....पण तिथे कोणी राहत नाही आता.... प्रेत आत्मा असतात म्हणे तिथे..... अभिजित.
"भावा कोणत्या जमान्यात जगतोयस तू , काय पण फालतू बोलू नकोस. हे भूत वगैरे सगळ्या भाकड कथा आहेत".....परेश
बर ठिक आहे तर....ठरल मग, आपण उद्या चाललोय भोर ला....it's ok na भावानो.....प्रदीप.
सर्वजण आपल्या  माना हलवू लागले. सगळेजण कधी आणि कुठे भेटायचं याच प्लॅनिंग करू लागले. सूर्य पूर्णपणे बुडालेला होता. एकदा का मित्र भेटले की वेळेच भानच हरवून जात. 
"बर चला निघूया आता ....बराच उशीर झालाय राव, आई वाट बघत असेल".....अमोल.
"बर ठिक ये....चला आता उद्याच्या तयारीला लागू...सर्वांच्या लक्षात आहे ना ? ठिक 10 वाजता आपण पोवई नाक्यावर भेटणार आहोत आणि हो आम्या उद्या तरी लवकर ये भावा"...प्रदीप म्हणतो.
"होय रे, उद्या नक्की लवकर येणार तूमच्या सर्वांच्या आधी येतो की नाय ते बघा.... अमोल.
म्हममम !!!...वाट बघा....परेश
सर्वजण हसू लागले.
ok  चला भावानो उद्या भेटू..bay,get ready for the trip.....अभि
ok bay...चला भेटूया......सर्वजण एकमेकांना निरोप देउन निघून गेले....
अमोल घरी येतो....आपण उद्या मित्रांसोबत बाहेर जाणार आहोत याची कल्पना तो आईला कळवतो. आई त्याला नको जाऊ असे म्हणत असते. शेवटी आईच तो काही एकत नाही.  सकाळी लवकर उठवायला तो आईला सांगतो.
अमोलच्या आईच नेहमी त्याच्या बद्दल काळजी असायची. शेवटी एकुलता एक ना....लहानपणापासून लाडावलेला. त्याचे वडील तो लहान असतानाच कँसर च्या आजाराने वारले. त्याच्या आईनेच त्याला लहानाच मोठ केल....
दुसऱ्या दिवशी.... सकाळ होत आलेली... अचानक अमोलला जाग येते. घामाने तो पूर्णपणे भितरलेला असतो.
पून्हा तेच स्वप्न....अमोल मनातल्या मनात म्हणतो.
"काय झालं रे बाळा..?पून्हा तेच स्वप्न पडल का?"..आई
"होय आई. सारख तेच स्वप्न पडतात मला.एक बाई सारखी माझ्या स्वप्नात येते...मला अमोल अमोल अशी सारखी हाक मारत असते...I don't know what's happening with me".....अमोल म्हणतो.
"बर,चल राहूदे बाळा जास्त विचार करू नकोस या गोष्टीचा...स्वपच तर होत...! चल लवकर उठ सकाळचे 9 वाजायला आलेत...फिरायला जाणार आहेस ना आज.आवरून घे मी तुझ्यासाठी नाष्टा करते"...आई म्हणते.
"shit yar,खूप उशीर होणार आज"....अमोल.
थोड्यावेळाने...."आई जातो गं, माझी वाट बघत बसू नकोस यायला अशीर होईल मला"...अमोल.
"काळजी घेरे बाळा".....अमोल ची आई सतत अमोलच्या बाबतीत चिंतेत असते. कारण, त्याच्या स्वप्नामुळे पण ती त्याला तसे दाखवून देत नाही.
अरे कुठे राहिला हा यार ?...10.30 वाजत आले तरी याचा पत्ता नाय राव...परेश रागात बडबडत होता.
म्हटलं ना नेहमीच आहे याच....प्रदीप म्हणाला. 
सर्वजण नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी पोवई नाक्यावर अमोलची वाट पाहत होते. तरीही तो अजून आला नव्हता. थोड्या वेळाने अमोल भरभर येत असलेला सगळ्यांना दिसतो.
"अरे! पंत आले बघा.... पूजा करा आता यांची"...अभि म्हणू लागला.
"सॉरी सॉरी यार. खूप लेट झाला यार मला, ते काय झालं आईने उठवलच नाही लवकर"...अमोल.
म्हममम...नेहमीच हाय राव तूमच...बर चला निघूया लवकर"...परेश.
सर्वजण श्री गणेशा करून प्रवासाला निघाले. पण त्यांना काय माहिती कि त्यांच्या नशीबात काय अघटित घडणार आहे ते. 
पण अमोलला जरा विचित्रच वाटत होते. कारण, त्याच्या स्वप्नांमुळे काहीतरी भयानक घडणार आहे असे त्याला जाणवत होते.
काय कुठे हरवलास ?...कालची झोप झाली नाही वाटत अजून....come on bro chill बघ सगळे किती enjoy करतायत चल.....प्रदीप म्हणतो.
अमोल पण त्यांच्यात सामील झाला. सर्वजण enjoy करू लागले. साधारण दीड तासात ते भोर या ठिकाणी पोचले. दुपार होत आली होती. तिथला परिसर जितका सुंदर होता तितकाच खूप भयानक ही दिसत होता. सगळीकडे जंगलासारखा परिसर एकदम सुनसान असा त्यात थंडीचे दिवस, थरारून जाईल अस वातावरण.
पण तेवढच मोहक असा परिसर...सगळीकडे झाडे धबधब्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज मोहात पाडेल असा.
"यार मस्त आहे रे आणि काय वातावरण आहे...it's great yar what a nature...किती शांत वाटतय ईथे...अभि म्हणतो.
सर्वांनी तिथे खूप मजा केली. आता हळूहळू संध्याकाळ होत आलेली होती. सूर्य मावळतीला चाला होता. थंडगार अस वार सुटायला लागल. सगळीकडे भयानक शांतता. त्यात हे चौघे त्या घनदाट जंगलात. काहीतरी अभद्र घडणार आहे अशी चाहूल होत होती. 
"चला यार खूप वेळ झालाय राव...6 वाजून गेले...घरचे वाट बघत असतील आपली"...अमोल चे मन चलबिचल होत होते.
"गप रे, काय राव बघ ना किती भारी मोसम आहे आणि तूझ सारख चला चला थांबूया थोडा वेळ"....परेश म्हणतो.
संध्याकाळचे 7 वाजायला आले... सूर्य पूर्णपणे मावळून गेला.... आता अंधारही पडू लागला.... सर्वजण आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले.
गाडी जंगलाच्या रस्त्यावरून भरधाव जात होती. सर्वत्र अंधार भुडूक. त्या अंधारात गाडीचा प्रकाश तेवढाच आणि अचानक गाडी रस्त्याच्या समोर असणाऱ्या दगडाला धडकते ...खडखड...करत गाडी बंद पडते.....
"shit yar.....हिला  पण आत्ताच बंद पडायची होती"...परेश म्हणतो.
सर्वजण गाडी बाहेर येतात. बघतात तर काय....गाडीचा टायर पंक्चर.
"oh my god !!!!....आता काय करायचं".....अभि.
"extra tire पण नाही याचा".... प्रदीप.
"मी काय म्हणतोय...चला पुढे काय मदत भेटते काय ते बघुया"....परेश.
"यार एवढ्या रात्री कुठे मदत भेटणार राव मला तर खूप भिती वाटते यार"....अमोल.
"हे बघ !! भित्री भागुबाई"....परेश हसायला लागतो.
त्याच्या या हसण्याला कोणच reaction देत नाही कारण सगळ्यांचीच पूर्णपणे वाट लागलेली असते.
सर्वजण त्या पायवाटेने कुठे काही राहायला वस्ती भेटते का ते बघायला चाललेले. एकदम सुनसान रस्ता. सर्वत्र भयावह असे वातावरण. बघाल तिकडे जंगलच जंगल. पाला पाचोळा तुडवत तुडवत ते चालले होते. ते चौघेच त्या जंगलात, रात किड्यांचा आवाज एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी अंग शहारून जायी. अचानक अमोल ला काहीतरी जाणवत. सगळ्यांच्या मागे तोच होता. मागून कोणीतरी बोलवतय असा त्याला भास होतो. तसच तो भितीने मागे बघतो तर त्याची बोबडीच वळते. एका झाडाच्या शेजारीच एक बाई उभी असते. एक प्रकारची सावलीच तिथे उभी असते. ती त्याला बोलवत असते. अमोल जोरात किंचाळतो. सगळेजण मागे बघतात ते द्रुश्य बघून सगळे हादरून जातात. सर्वजण जोराचा पळ काढत जातात. अचानक समोर त्यांना एक मोठा वाडा नजरेस पडतो. काहीही विचार न करता ते त्या वाड्याच्या आत शिरतात.
ह्हहहहह.....सगळे धापा टाकत असतात....
"यार वाचलो रे नायतर आपली आज अंतयात्रा झाली असती"......प्रदीप.
"होय यार , आपण कुठे आलो आहोत यार"...अभि.
"दिसायला तर हा खूप मोठा वाडा वाटतोय"....परेश.
"अरे हा तर तोच वाडा आहे....झपाटलेला वाडा"...अमोल.
वाडा दिसायला अगदी जून्या काळातील... अगदी भयानक असा. तांबरलेल गेट, भिंतीवर काळे डाग आणि चिरा पडलेल्या, शेजारीच खूप मोठ पिंपळाच झाड पूर्णपणे वाळलेल...
जसजसे ते दरवाच्या पाशी जातात तशीतशी आणखी भिती वाढत जाते आणि अचानक एक वाऱ्याची झुळूक त्यांना भेदून जाते तसे त्यांच्या अंगावर काटाच येतो. कर्रर्रर्र....अशा आवाजात दरवाजा आपोआप उघडतो. ते सर्व आत मध्ये जातात बाहेर नाही तेवढी कडाक्याची बर्फासारखी थंडी होती आतमध्ये. सळो की पळो अशी गत झाली सगळ्यांची.
काळा कुट्ट अंधार, कुबट असा वास सगळीकडे पसरलेला जस की खूप वर्षांपासून हा वाडा बंद होता. सर्व ठिकाणी कोळ्यांचे जाळे पसरले होते.
अचानक त्यांना कसलातरी भास होतो. त्या चौघांपैकी अजून कोणीतरी आहे असे त्यांना वाटते. 
"एक मिनिट.....हा हसण्याचा आवाज".....परेश म्हणतो.
"तूम्ही इथेच थांबा मी बघून येतो.... सगळेजण नको म्हणतात तरी परेश आत मध्ये जातो.... त्या अंधारात मोबाईलच्या टॉर्च ने बघायला जातो. एकदम शुकशुकाट....अचानक परेशचा किंचाळण्याचा आवाज येतो. सगळे आत जातात तेवढ्यात दरवाजा खाड; करून बंद होतो. ते दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात. दरवाजा तोडून आत जातात तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते परेश खाली पडलेला असतो. तो वरती बोट दाखवतो आणि तिथेच तो मरण पावतो... सगळ्यांच्या नजरा वरती भिंतीवर जातात..... बघताच क्षणी सर्व हादरून जातात.....जनावर की प्रेत आत्मा काही कळण्याच्या पलीकडच चेहऱ्यावर भयंकर हास्य सावली सारखी त्याची भयावह प्रतिमा विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होता.... कर्रर्रर्रकश्य असा आवाज....
सर्वांनी तेथून काढता पाय करण्याचा प्रयत्न त्यांनी केला जिवाच्या आकंताने ते पळू लागतात... बाहेर येताच प्रदीप दरवाच्या बाहेर पडतो.... पडताच क्षणी त्याचा पाय ओढून आत घेऊन जात..... वाचवा अशी हाक मारून प्रदीपचाही अंत होतो..... आता फक्त राहिले दोघेच... अमोल आणि अभि त्या दोघांना काय कराव समजत नाही. अचानक बाहेरील दरवाजा पण बंद होतो.
सगळीकडे काळभोर अंधार....त्या भयान वाड्यात आता ते दोघच राहीलेले.
"आता काय करायच रे"....अभि.
ही ही ही ही......;;;भेसूर असा आवाज घुमत होता.
आता तूमची पाळी आहे.... मरायची कुतरड्यांनो...
अचानक अभिला एक कल्पना सुचते.... तो लहानपणापासून हनुमानाचा भक्त होता....मोठमोठ्याने तो हनुमान चालीसा म्हणायला लागतो....
एएए....नासक्या जिव घेईन मी तूझा....प्रेत आत्मा म्हणतो.
देवाच्या मर्जीपूढे त्या आत्म्याचे काही चालत नाही....एकदमच ती गायब होते.सकाळ होते... ते दोघे सुखरूप घराबाहेर येतात.
आपल्या मित्रांसोबत जे झाले त्याच त्यांना खूप दूख झालेल असत.
पण या कथेचा इथेच शेवट होत नाही. पुढे काय होईल? काय घडेल पुढे ?....यासाठी लवकरच येईल या कथेचा पूढचा भाग....
                                 क्रमशः

Comments

Popular posts from this blog

भेट...

online वाल प्रेम...