भेट...
भेट... आपल्या सगळ्यांची एक अपेक्षा असते की आपण ज्याच्यावर प्रेम करू ती जगातील सर्वात सुदंर व्यक्ती असावी .... पण, प्रत्येकाचे सौंदर्याचे मायने हे वेगवेगळे असतात. जसे की काहींना गोरे लोक आवडतात तर काहींना सावळे, काहींना उंच तर काहींना छोटे .कोणाला जीव लावणारी मनमिळावू हवी असते. असेच प्रत्येक व्यक्तीला त्याची लाईफ पार्टनर मिळावी अशी अपेक्षा असते. अश्याच एखाद्या व्यक्तीच्या शोधात कुलदीप होता..त्याची अपेक्षा होती की त्याला त्याची लाईफ पार्टनर ,स्लिम, गोरी मुलगी जीचे केस कमरेपर्यंत लांब असावी आणि डोळे निळसर रंगाची अशी होती ते साहजिकच होते कारण तो दिसायला देखणा देखील होता. तो दरवेळी अशाच मुलीचे स्वप्न बघत असायचा आणि प्रत्यक्षात म्हटलं तर तो २८ वर्षाचा झाला तरी त्याला अशी मुलगी मिळालीच नाही आणि त्याच्या घरच्यांनी ही त्याच्यावर लग्नाच प्रेशर ट...