भेट...

                        

                                      भेट...

आपल्या  सगळ्यांची एक अपेक्षा असते की आपण ज्याच्यावर प्रेम करू ती जगातील सर्वात सुदंर  व्यक्ती असावी .... पण, प्रत्येकाचे सौंदर्याचे मायने हे वेगवेगळे असतात. जसे की काहींना  गोरे लोक आवडतात तर काहींना सावळे, काहींना उंच तर काहींना छोटे .कोणाला जीव लावणारी मनमिळावू हवी असते. असेच प्रत्येक व्यक्तीला त्याची लाईफ पार्टनर मिळावी अशी अपेक्षा असते. अश्याच  एखाद्या व्यक्तीच्या शोधात कुलदीप होता..त्याची अपेक्षा होती की त्याला त्याची लाईफ पार्टनर ,स्लिम, गोरी मुलगी जीचे केस कमरेपर्यंत लांब असावी आणि डोळे निळसर रंगाची अशी होती ते साहजिकच होते कारण तो दिसायला देखणा देखील होता.

तो दरवेळी अशाच मुलीचे स्वप्न बघत असायचा आणि प्रत्यक्षात म्हटलं तर तो २८ वर्षाचा झाला तरी त्याला अशी मुलगी मिळालीच नाही आणि त्याच्या घरच्यांनी ही त्याच्यावर लग्नाच प्रेशर टाकायला सुरुवात केली. त्याने ही लग्नासाठी होकार दिला. पण त्याला माहिती होत की ज्या मुलीसाठी त्याच्या घरचे लग्न ठरवणार आहेत त्याला ती कधीच पसंत पडणार नव्हती. म्हणून त्याने मुलगी बघण्यासाठी पण नकार केला.

आणि मग काय... त्याने घरातल्या लोकांच्या दबावामुळे शेवटी  लग्नाला होकार दिला. तो त्या मुलीला बघायला सुद्धा तयार नव्हता. मग एक महिन्यानंतर त्याने डायरेक्ट लग्न केले. दुसर्याच दिवशी कामाचे कारण सांगुन तो दोन महिन्यांसाठी टुर ला गेला आणि इथे त्याची वाईफ त्याच्या येण्याची वाट बघत बसली. पण, तो घरापासून कधीपर्यंत लांब राहू शकला असता. दोन महिन्यानंतर तो जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याची वाईफ ईशा ने त्याच्यासाठी दरवाजा उघडला.  निळ्या साडी मध्ये असलेल्या ईशा ने थोड्या अडखळत आवाजात विचारले.

" Hii !!!!!!!!!!!!!!!",....ईशा म्हणाली.

" Hi !!! " ,....कुलदीप ने उत्तर दिले.

कुलदीप फक्त एवढेच बोलून खोलीमध्ये निघून गेला आणि ईशा ला कुलदीपच्या या reaction बद्दल काही समजलच नाही. तिला वाटलं की कुलदीप थकला वगैरे असेल म्हणून काही न बोलता फ्रेश व्हायला गेला असेल.

कुलदीप ने पहिल्यांदा ईशा ला बघितलं होत. ती त्याच्या विचारतील लाईफ पार्टनर सारखी तर नव्हती ज्या मुलीच स्वप्न कुलदीप बघत होता. पण, ईशा आपल्याच अंदाज मध्ये खूप सुंदर होती. तीचे केस कंबरेपर्यंत तर नव्हते फक्त खांद्यापर्यंत होते. कुलदीप ला निळे डोळे असलेली मुलगी हवी होती. पण ईशा काळे भोर रंगाची सावळी अशी मुलगी होती. कुलदीप ला जास्त काही असा फरक नाही पडला. कारण की, त्याला तरीही काही अपेक्षा नव्हती.

पण ईशा, काय माहिती पण ती एवढ्या अपेक्षेने बसली होती की आपली ही नवीन दुनिया आणि आणि आपल्या आयुष्या बरोबर.... कुलदीप च्या या वागणुकीमुळे ती काहीशी आश्चर्यचकित झालेली होती. या दोन महिन्यामध्ये ती फक्त एवढाच विचार करत होती की कुलदीप आल्यावर काय होईल. ती त्याच्यासाठी हे करेल ते करेल तीचे स्वप्न तिच्या डोळ्यांमध्ये चमकत होते. पण कुलदीप  परत आल्यानंतर तिच्या डोळ्यातील ती चमक जशा डोळ्यातील अश्रुं सारखे वाहून गेली. कुलदीप काही वेळानंतर रुममधून बाहेर आला.

" अहो......चहा पिणार तुम्ही ??? ,"....

"म्हहह....., "

" तुमची ट्रीप कशी होती ????.... ,"

" ठीक होती .....,"़

" I hope तुमची सगळी कामे चांगल्याप्रकारे झाली असतील, "

" हो यार irritating नको करु, चहा दे बस....जा ..leave it, “forget it" ...“तु का जाशील मीच निघून जातो,"

" अस काय केलयं मी??...जेव्हा पासून आलेत तेव्हापासून खूप रागात आहेत,"

ईशा ला कुलदीप च्या रागवण्याच कारण समजत नव्हते. ती रात्रीची वाट बघू लागली आणि जेव्हा सगळी कामे आटपून झाल्यावर रात्री आपल्या रुममध्ये गेली तेव्हा बघितलं की आनंद सोफ्यावर झोपलेला होता. ती गपचूप रडत रडत बेडवर झोपून गेली. असेच खूप दिवस निघून गेले तरी कुलदीप अशा वागण्याचे कारण तिला काही समजत नव्हते.
तिने कुलदीप शी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण, कुलदीप कोणत्याही प्रश्नांची सरळ उत्तर द्यायला तयार होत नाही.

" अहो !!! काय झालं ???...तुम्ही दर वेळी माझ्यावर का चिडचिड करता ?? का दरवेळेस रागवत असता ??? मी काय चुकीचं केले आहे का ?"......;

" नाही तुझ्याकडून काही चुक झाली नाही ",.....;;;;;

" तुम्हाला दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का ? ",;;;;

" हे बघ मी खूप दमलोय, झोपूदे मला ",.....

"नाही. नाही आज तुम्हाला बोलावच लागेल. अशी कोणती गोष्ट आहे ? का देताय अशी शिक्षा मला ? ", ....;;;;

" ok, तर एक.... तुला जाणून घ्यायचे आहे ना. मला तुझ्या सारख्या मुली बरोबर लग्न करायचंच नव्हतं. मला एका सुंदर मुली बरोबर लग्न करायचं होत पण, bloody bad luck..;;; मला तू भेटलीस ",;;;;;;;

" तर तुम्हाला माझ्या चेहर्याचा प्रोब्लेम आहे ",......;" yes, you are right...... मला तुझ्या चेहर्याचा प्रोब्लेम आहे; मला तुझ्याकडे बघायला पण आवडत नाही समजलं ",.....

" फक्त सुंदर चेहरा तुमच्यासाठी सगळं आहे ??? ",.....

" हो.... do you have a problem with that ?",......;;;;;

" ठीक ये, मग मी ईथे राहून काय करु....; एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा... प्रेम चेहर्याशी नाही, मनाशी होते;;...सौंदर्याशी नाही, आत्म्याशी होते;...आणि ज्याच्या मनात प्रेम असतं ना ते आपोआप सुंदर होऊन जातो;...प्रेम माणसाला आतुन सुंदर बनवतो आणि आज पासून माझ्या नजरेत तुमच्यासारखा कुरुप माणूस कोणीच नाही....कारण तुमच्या मनात कोणासाठी पण प्रेम नाहीये. तुम्हाला माझा चेहरा नाही बघायचा ना...माझा सावळा रंग बघून तुम्हाला राग येतो ना... तर मग मी तुम्हाला आज पासुन वचन देते की माझा हा कुरुप चेहरा तुम्हाला कधीच पाहायला नाही मिळणार  but i hope......की तुम्हाला कोणासोबत खर प्रेम होईल ",...;;;;;;

ईशा डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन कुलदीप च्या नजरेसमोरून त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि कुलदीप ज्या मुलीची वाट बघण्यासाठी ईशा ला दुखावले तशी मुलगी त्याला मिळालीच नाही. तशीही कधी मिळणारच नव्हती कारण तो एक गोष्ट समजत नव्हता की जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती शी प्रेम करायला लागतो ती व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती समजू लागतो. कुलदीप ने स्वतः ला आऑफिसच्या कामात व्यस्त ठेवले. कधी कधी लोक स्वतः ला आपल्या प्रेमापासुन लांब ठेवतात आणि काही लोक नशिबवान च असतात ज्यांना दुसरी संधी मिळते.

"आउच!!!!.....;;;ओ मिस्टर बघून चालता येत नाही का ?",....

" ओ..... sorry madam चुकुन धक्का लागला तुम्हाला लागलं तर नाही??"....;;; ईशा तू !!!!!!!!...….

" तुम्ही "!!!!......;;;;;;

ईशा आणि कुलदीप काही का होईना पण नशिबाने त्यांची पुन्हा एकदा भेट घडवून आणलीच.....

" अअअ...hii......कशी  आहेस ??? ",.........

" कशी असणार....जसं तुम्ही सोडलं तशी.....विचित्र चेहर्याची ", .....

"अ..अ..अ.. हे बघ ईशा....माझा हेतू तुला दुखवण्याचा नव्हता पण....मी तुझ्यावर कधी प्रेम करू शकलो नसतो. you know it was ", ........

" होय....I know ", .....

" तर मग तु एवढी नाराज आहेस की that we can't even be friends " ,.......

" तुम्ही दुसरा कुठला पर्याय नाही ठेवला, प्रेम तर तुम्ही नाही करू शकत. चला तर मग मित्र तरी बनूया "., .....मला काही च हरकत नाही तुमच्यासारख्या hopeless मित्रा बरोबर मैत्री करायला ", ;;;;;;;;;

" चेष्टा करतेस माझी.....हा.हा हा.....बर ते जाऊ दे तु या कॉफी शॉप वर एकटीच आलेली की अजून कोणाबरोबर ?",....

" एकटीच आलेली.... घरात बसुन बसुन बोर होत होते तर म्हटलं काही वेळ ईथे टाईमपास करत बसलेले आणि तुम्ही ???", .....

"मी....मी फक्त कॉफी प्यायला आलेलो ईथे समोरच्या बिल्डिंग मध्ये माझ ऑफिस आहे " , ......

"आओ....okk...;;; "

" बर एक ना.... आज संध्याकाळी फ्री आहेस का ???...माझा विचार आहे की मुव्ही बघायला जाउया....तस काही नाही but I thought we are friends so मुव्ही बघायला तर जाऊ शकतो ना ",.......

" ok......ठीक आहे....."

कुलदीप एवढा पण रागीट स्वभावाचा नव्हता. त्याला जाणीव होती की त्याने ईशा ला दुखवलेले. त्याच तिच्यावर प्रेम नव्हतं फक्त एवढच होत की स्वतः वरच गील्ट कमी करण्यासाठी त्याने ईशा बरोबर मैत्री केलेली. कारण तो या गोष्टी ची काळजी घेऊ शकेल की ती खुश आहे. ईशा ने पण काही विचार नाही केला. तिने चुकीचे की बरोबर या सगळ्या गोष्टी विसरून फक्त या क्षणाचे आयुष्य जगायच ठरवलं. तिच्याकडे पण आता गमवण्यासारख अस काही नव्हते. एक  husband होता त्याने सावळी म्हणून सोडून दिले आणि आता तोच नवरा प्रेमाची किंमत मैत्री ने वसुल करतोय.

" what a movie मजा आली यार ", .......;;;

" हा हा...तुम्हाला तर आवडलीच असेल. माझी तर घाबरून हालत खराब झालेली.... ",

" मला माहिती नव्हतं की तु हॉरर मुव्ही बघून ईतकी घाबरतेस ते ",......

" तुम्हाला तर खूप काही माहिती नाही...तसही तुम्ही जास्त स्वतः ला शुर वीर समजु नका...ते झाडावर लटकलेल भुत बघून जाम घाबरलेला ",......

" हा हा.....ठीक ये... आईसक्रीम ???? ", .....

" yes please.........;;;;;;;; "

" strawberry ice cream right........."

" हा हा !!!!! तुमच्या लक्षात आहे ??? ",....

"हा...एवढा पण वाईट माणूस नाही यार मी ",.......

" नाही नाही....फक्त ह्रदय तोडलय माझ...बाकी सगळं ठीक ये.... don't worry....चेष्टा केली तुमची ",;;;;;

" अच्छा.... खूप उशीर झालाय ना...मी तुला ड्रोप करु ?..... "

" its ok....मी जाईन माझी मी.....",
" no no...it's getting very late I'll drop you....",

" चक्क माझ्यावर हक्क गाजवताय???......",

" तू टोमणे मारणे कधी बंद करशील ???.....",

" ok ok.....चला निघूया ",....

"  ok... आलो आपण घरी....तर तु ईथे राहतेस ",...

" मग काय करु....घरच्यांना हे सांगू की माझ्या नवर्याने मला या साठी सोडलं कारण की मी सुंदर नाहीये.!!!!....."

" हे बघ...ईशा am really very sorry....",

" it's ok.... मी काही तक्रार नाही करत आहे... thanks for dropping me.....good night see you ",....

" good night ", ......

या ज्या थोड्याश्या मिळणाऱ्या मैत्रीतून ईशा खुश झाली. पण कुलदीप हा करु लागला की या आधी तो ईशा शी मैत्री करण्याचा प्रयत्न का नाही केला. दोघेजण एकमेकांच्या बरोबर एवढे अनुरूप होते पण त्याने कधी प्रयत्न च नाही केला. ईशा च्या घरी पोहोचल्या नंतर कुलदीप ने तिला मेसेज केला.

" hi.....आताच पोहोचलो बघ....",

" good......;;;;;;"

" आज खूप मजा आली ना......"

" होय....मला सुद्धा......;"

" am sorry..........."

" का ?????......."

"म्म्म..... तुला हॉरर मुव्ही ला घेऊन गेलो त्याबद्दल ",.......

" काही हरकत नाही नेक्स्ट टाईम तुम्हाला रोमँटिक मुव्ही दाखवून तुमचा बदला घेईन okk ",.......

" sure any time ......",

" चला...आता झोपूया..खूप उशीर झालाय उद्या ऑफिस आहे ",......

" obviously......तर तुम्हाला काय वाटलं... मी माझा खर्च कसा चालवते ",.....

हे वाचताच क्षणी कुलदीप च्या अंगावर एकदम काटा आला. कुलदीप ने जरा सुद्धा विचार नाही केला की ईशा घर सोडून गेल्यावर ती कुठे जाईल कुठे राहील आणि बस स्वार्थीपणाने त्याने फक्त स्वतः चा विचार केला आणि ईशा मात्र सगळं सहन करत राहिली.

" काय झालं ???....मध्ये च कुठे गायब झालात....",

" नाही काही नाही.... by the way.....कुठे आहे तुझ ऑफिस ? ",
" कोथरूड मध्ये.....",

" ते तर रस्त्यातच आहे मी सोडतो तुला.... okk ",

" अरे याची गरज तुम्हाला उगीच त्रास........",

" अरे यार एक मित्र दुसऱ्या मित्राची मदत नाही करु शकत का....",

" ok if you insist then.....भेटू उद्या सकाळी ८ वाजता "......

" fine....ok good night ",.....

" good night but ".....

कुलदीप रात्रभर हाच विचार करत राहीला की किती वाईट वागलो आपण ईशा बरोबर किती स्वार्थी पणाने वागलो. तिला दुखावले आणि तिच्या कडे वळून बघू पण नाही शकलो. त्याच्या एका चुकीमुळे एका मुलीची पूर्ण लाईफ ईकडे तिकडे झाली. एक मुलगी जी आपले सुंदर स्वप्न घेऊन त्याच्या घरी आलेली त्याने तिचे सर्व स्वप्न तोडून टाकले आणि या कारणांमुळे ती आपल्या घरी आई बाबाकंडे पण नाही गेली. कुलदीप ने ईशा च्या आयुष्यातला प्रत्येक गोष्टीतल प्रेम काढून घेतलेलं आणि हीच गोष्ट त्याला मनामध्ये टोचलेली.

" आले आले......ओ... good morning.....sorry am so sorry....उशीर झाला थोडासा.....

" it's ok ....good morning....", "सीट थोडी पुढे मागे घेऊ ...are you comfortable..;;;;;",

" yes yes....am ok..... thanks",

" अच्छा मला हे सांग की ऑफिसमध्ये काय काम करतेस तू;....",

" एका मिडिया कंपनीमध्ये कॉपी रायटर चा जॉब करते....",

" मला नव्हतं माहिती तुला रायटिंग मध्ये इंटरेस्ट आहे.....",

* मला सुद्धा नव्हतं माहिती...पण जेव्हा एकटी राहून कळालं की दुसरी कोणती प्रतिभा नाहिये माझ्यात...बस थोड फार लिहीण्याची आवड आहे.... ",

" ohh that's good.... ",

" बस...बस...हे माझ ऑफिस...",

" ok चलो then have a good day and by take care ".,.

" you too.....",

ईशा कार मधून उतरली आणि ऑफिसला गेली. पण, कुलदीप मात्र ऑफीसला नाही जाऊ शकला. तो तिथेच थांबून संध्याकाळपर्यंत ईशा ची वाट पाहू लागला. ईशा संध्याकाळी त्याच्या कलिग बरोबर बाहेर आली त्यावेळी तिला कुलदीप बाहेर उभा राहीलेला दिसला. 

" हाय!!!!..तुम्ही ईथे....",

" हा मी विचार करत होतो की घरी परत चाललोय तर तुला घेऊन ड्रोइ करु.....",

" ओके....आणि तसही आरामाची सवय लावू नका मला ",

" पूर्ण रस्त्यामध्ये कुलदीप काहीच नाही बोलला फक्त थोडा थोडा डोळ्यांच्या नजरेने तो ईशा ला पाहू लागला आणि आज पहिल्यांदा त्याला ईशा साठी काहीतरी वाटले काहीतरी फिल झाले. तिला दुसऱ्या कोणाबरोबर बघून कुलदीप ला बरोबर नाही वाटलं. त्याला वाटत होते की ईशा च घर कधी येऊच नये आणि तो असाच तिच्या चेहर्याकडे  बघतच राहील...त्या चेहर्यासाठी जो त्याला आधी कधी आवडत नव्हता.
" काय झालं....??? असे गप्प गप्प का आहात...???",

" अअअ..नाही काही... तो मुलगा कोण होता जो आत्ता तुझ्याबरोबर बाहेर आला???....",

" हा तो .....कलिग आणि एक चांगला मित्र त्यानेच मला हा जॉब लावायला मदत केली....",

" ओ!!!!....कलिग... बघून तर तस वाटत नव्हतं...",

" म्हणजे.....????",

" म्हणजे कस अशी तु कोणाशी क्लोजली बोलू शकतेस यार...",

" what.....आणि का नाही करु शकत ???....,",

" कारण... कारण तू माझी वाईफ आहेस you got dam it...",

कुलदीप जे बोलून गेला जे त्यांच्यात नकळत होत. त्या दोघांमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण झाली. कुलदीप समोर बघू लागला आणि ईशा खिडकीकडे.

" अरे ....अहो माझ घर मागे राहून गेल......',

" ओ!!!!!!am sorry......",

" it's ok.......",

" No am sorry for everything ईशा ......",

" कुलदीप हे बघा....प्रेम एक तर होत नाही तर नाही होत....
माझं होतं आणि तुमचं नाही...आपण दोघेही या गोष्टीवरून काही नाही करु शकत....",

" माझ आहे....माझ तुझ्यावर प्रेम आहे ईशा....आणि तुझ अजुनही....",

"  हे एकताच ईशा च्या डोळ्यांत पाणी आले...आणि ती धावत धावत घराकडे निघून गेली कुलदीप ही तिच्या मागे गेला.

" ईशा....ईशा....प्लीज मला माफ कर ईशा. मी छोटी शी गोष्ट समजू नाही शकलो. मी....मी खूप मोठा मूर्ख आहे... मी समजू नाही शकलो प्रेम चेहर्याशी नाही तर व्यक्ती शी केल जात....",

" कुलदीप प्लीज.... मला पुन्हा त्या गोष्टी मध्ये नाही पडायच किती अवघड परिस्थिती मधून स्वतः ला सांभाळय....मी आता पून्हा त्यात नाही पडू शकणार.....मी तुमच्या नजरेत सावळी होते आणि आयुष्यभर राहणार....",

" मी चुकलो ईशा....I was wrong....माझ्या नजरेत तु आयुष्यातील सर्वात सुंदर मुलगी आहेस...मला मला फक्त तुला बघायचेय....प्लीज विश्वास कर...",

" कुलदीप प्लीज....आता खूप उशीर झालाय...",

" म्हणूनच...म्हणूनच तर मी अजून उशीर नाही करु शकत...मला माझी चुक सुधारायची आहे....प्लीज... प्लीज ईशा फक्त एक चान्स दे....मी प्रोमीस तुला परत कधीच नाही दुखवणार.....फक्त एक चान्स दे मला पण आपल्या प्रेमासाठी तर दे....ईशा प्लीज दार उघड ईशा.....",

काही वेळानंतर फायनली ईशा ने दरवाजा उघडला आणि कुलदीप ला अजून एक चान्स दिला. ईशा कुलदीप वर आधी पासुनच प्रेम करत होती त्या दिवसापासून  ज्या वेळी लग्नासाठी कुलदीप चा फोटो दाखवलेला. पण या वेळी त्यांनी मैत्री शी सुरुवात केली आणि प्रेम आपोआप झाले. कुलदीप ईशा वर एवढे प्रेम करु लागला की तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होईल. कधी कधी प्रेम हे आपल्या समोरच असत आणि आपण त्याचा चेहरा ओळखुच नाही शकत. कारण आपण चुकुन जातो की प्रेम आणि चेहरा यांना वेगवेगळे समजण्यामध्ये. मला वाटते की आपण थोडे पुढे गेल पाहिजे रुप रंगामधून तरच प्रेमाच्या जवळ जाऊ शकतो आपण. कारण प्रेम हा काही चेहरा नाही..... प्रेम ही एक भावना आहे. जी आपल्या सर्वांच्या ह्रदयात असते. फक्त त्याला ओळखायचा प्रयत्न करा......

तर मित्रांनो ही होती एक सुंदर अशी छोटी शी लव स्टोरी.. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच शेर करा आणि कमेंट्स सुद्धा करा....धन्यवाद

माझा email id आहे - manevishal947@gmail.com


Comments

Popular posts from this blog

..वाचलास रे वाचलास..(भयकथा-एका प्रवासाची)

वाडा...